अनाथ/गरीब मुला-मुलींसाठी आयपीए (प्रोवेदोरिया) द्वारे चालविलेले आश्रयस्थान.

 प्रोवेदोरिया 10 वृद्धाश्रम आणि 02 बाल केंद्र चालवितात जी खालील प्रमाणे आहेतः

  1. चिंबल
  2. म्हापसा
  3. कांदोळी
  4. आल्तिनो, पणजी
  5. साळगांव
  6. गोवा-वेल्हा(मुलींसाठी),
  7. कांदोळी (मुलांसाठी) उत्तर गोवा आणि
  8. मडगाव
  9. माजोर्डा
  10. लोटली
  11. कुंकळ्ळी आणि
  12. 300 निवासी क्षमतेसह दक्षिण गोव्यातील चिचोणे.

इमारत, स्थान, इतिहास आणि आश्रयस्थान/केंद्रांचा तपशील

  1. मडगाव आश्रयस्थान
    1978 मध्ये कै. अरिस्तीदीस दा कॉश्ता यांना समर्पित त्यांच्या मित्रांनी त्यांच्या आठवणी कायम ठेवण्यासाठी आल्बेरी दो साग्रादो कोरासांव दे जेजूस, वृद्धांसाठी आश्रयस्थान सुरू केले.

    1867 मध्ये फा. आंतोनियो जुवांव मिरांद यांनी स्थापन केलेल्या हॉस्पिसिओ हॉस्पिटलद्वारे या आश्रयस्थानाचे प्रशासन चालत होते. हे मूळतः स्मशानभूमी रोडवर त्याच्या प्रवेशद्वारासह वसलेले होते आणि हॉस्पिसियोला जोडले गेले होते.

    अल्बेरी 1972 मध्ये बेर्नाद दा कॉश्ता रोडवरील मुख्य प्रवेशद्वारासह त्याच्या सध्याच्या इमारतीत हलविण्यात आले आहे.
    प्रशासन 1.1.1977 रोजी प्रोवेदोरियाने ताब्यात घेतले आणि तेव्हापासून ते 60 निवाशांच्या क्षमतेसह प्रोवेदोरियाद्वारे चालविले जाते. सध्या एकूण 50 निवासी आहेत. 27 महिला आणि 23 पुरुष.

  2.  

    माजोर्डा आश्रयस्थान
    हे आश्रयस्थान कालाटा या शांत आणि हिरवळीच्या गावात वसलेले आहे. सध्या गुदिन्य वाडा येथे स्थित असलेले पुरातन पोर्तुगीज शैलीचे जुने जागतिक आकर्षण असलेले हे प्रासादिक घर मूळचे या गावातील प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक म्हणजे पेद्रो पावलो गुदिन्य आणि आफोन्स गुदिन्य यांचे होते. या घराच्या आजूबाजूला आल्हाददायक हिरवळ अशी माडांची आणि आंब्याची बाग आहे. 28.10.1954 साली हे ठिकाण परोपकारी आणि नम्र पाद्री रेव. मो. मॅक्सी गुदिन्य यांनी प्रोवेदोरियाला दान केले होते.

    या घराच्या इतिहासाबद्दल थोडे अधिक जाणून घेताना असे दिसून येते की श्री. पेद्रू पावलो गुदिन्य यांनी घर सोडल्यामुळे श्री. अफोन्सो गुदिन्य एकटेच मालक झाले. त्याचे वंशज पोर्तुगालमध्ये स्थायिक झाले आणि भार वसूल करण्यासाठी, मालमत्तांसह घर दिवाणी न्यायालयात सार्वजनिक लिलावात विकले गेले.

    त्या घरात जन्मलेल्या मो. गुदिन्यला वाटले की मानवतावादी हेतूसाठी घराचा उपयोग करण्यासाठी हे घर परत घेतले पाहिजे. त्यांनी ते विकत घेतले आणि संपूर्ण नूतनीकरणानंतर परिसरातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आरोग्य केंद्र सुरू करण्याच्या अटीसह धर्मादाय भगिनींना सुपूर्द केले. लादलेली अट आदात्याने संकलित केलेली नसल्यामुळे, ती काढून टाकली गेली आणि प्रोवेदोरियाला दिली गेली.

    या घरामध्ये प्रोवेदोरिया केवळ महिला ज्येष्ठ निराधार, दिव्यांग, आजारी आणि वृद्ध विविध पंथांतील नागरिक, जाती आणि गोवा राज्याच्या सर्व संबंधितांना सामावून घेते. हे असे ठिकाण आहे जिथे निवाशांना आध्यात्मिक मार्गदर्शनासह त्यांच्या मूलभूत गरजा जसे की अन्न, औषधे, कपडे इत्यादी पुरविले जाते. आश्रयगृहाची क्षमता 40 असून सध्या यात 27 महिला आश्रय घेत आहेत.

  3. कुंकळ्ळी आश्रयस्थान/केंद्र
    कुंकळ्ळी केंद्राची स्थापना लोक सहायता संस्थेने केली होती आणि याचे उद्घाटन 3 मार्च 1966 रोजी संचालक कै.अनंत कामोतीन यांच्या हस्ते करण्यात आले.

    सुरुवातीला या केंद्राच्या स्थापनेचा एकमात्र उद्देश त्यांच्या अविवाहित मातांनी आणि गरिबीने ग्रासलेल्या पालकांनी सोडलेल्या अनाथ मुलांचे उत्थान, प्रेम, काळजी, संरक्षण, शिक्षण आणि सर्वांगीण विकास या गरजा पूर्ण करणे असा होता.

    शिक्षण आणि प्रौढत्व प्राप्त केल्यानंतर सर्व मुलांना आमच्या प्रोवेदोरियासह गोवा सरकारच्या विविध विभागीय कार्यालयांमध्ये नोकर्‍या देण्यात आल्या, नोकरी मिळाल्यानंतर त्यापैकी बहुतेकांनी हे केंद्र सोडले आणि त्यांचे विवाह जोडीदार निवडले आणि अशा प्रकारे त्यांचे घर आणि कुटुंब खाजगीरित्या व्यवस्थापित केले.

    1985 पासून हे केंद्र वृद्ध आणि निराधार पुरुष आणि महिलांची सेवा करते आणि सध्या 40 निवाशांच्या क्षमतेसह 9 पुरुष आणि 13 महिला निवासी येथे आहेत.

  4. चिचोणे आश्रयस्थान/केंद्र
    सासष्टी तालुक्यातील चिचोणे नावाने ओळखल्या जाणार्‍या सर्वात मोठ्या गावात हे केंद्र आहे. हे घर कै. पाशाव रुद्रिगीश यांचे मूळ घर होते. कुटुंबाच्या दुर्दैवी परिस्थितीमुळे, मालमत्ता आणि भातशेतीसह हे घर 1885 साली “असोसिएशन दे कारिदाद दे चिचोणे” (चॅरिटी असोसिएशन ऑफ चिचोणे) च्या ताब्यात आले आणि त्यांनी ते 21.3.1980 रोजी प्रोवेदोरियाला दान केले.

    सुरुवातीला हे केंद्र आश्रय, अन्न, वस्त्र आणि शिक्षण देऊन वाढलेल्या अनाथ मुलांची (6 वर्षे व त्यावरील वयोगटातील) काळजी घेत होते. पुनर्वसन झाल्यानंतर निवासी आपल्या आयुष्यात स्थिर होतात.

    सध्या या केंद्राचे रुपांतर वृद्धांसाठी आश्रयगृह म्हणून झाले आहे, ज्यामध्ये वृद्ध निराधार आसरा घेत आहेत. सध्या 15 पुरुष आश्रयस्थानी आहेत.

  5. लोटली आश्रयस्थान
    लोटलीचे अॅड. जुवांव विन्सेंत दे फिग्रेद यांनी जमिनीची मालमत्ता विकत घेतली आणि त्यांच्या या उदारतेमुळे आश्रयस्थान अस्तित्वात आले जे फक्त वृद्ध महिलांसाठी 10 नोव्हेंबर 1955 रोजी खुले करण्यात आले. त्याचे उद्घाटन 10 मे 1956 रोजी गव्हर्नर जनरल पॉल बर्नाद गुदी यांच्या हस्ते करण्यात आले आणि यावेळी पूर्व भारताचे गव्हर्नर जनरल डॉन जुझे वियेरा आल्वेर्नाज पात्रियाक, तत्कालीन नागरी सेवा संचालक डॉ. जुझे आंतोनियो इस्मायल ग्राशियस (लोटली) उपस्थित होते.

    मग लोटलीचे रेव. मो. सेबास्तियांव कायतान दे पियेदाद कोता यांनी आपल्या स्वतःच्या नातेवाईकाच्या सांगण्यावरून संपूर्ण मालमत्ता आल्बेरीला दान केली आणि चॅपल आणि इतर विंग बांधले गेले. त्यांनी सेंट मारिया मागदालेना आल्बेरीचे पालक बनविले. हे फेस्त दरवर्षी 22 जुलै रोजी साजरे केले जाते.

    पुरुषांसाठी असलेल्या या नवीन विंगचे उद्घाटन 12 फेब्रुवारी 1961 रोजी तत्कालीन प्रोवेदोरिया संचालक गव्हर्नर जनरल वासालो सिल्वा यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. जुझे द सिल्वा पेरेर हे प्रोवेदोरियाचे तत्कालिन संचालक होते.

    या आश्रयस्थानात एकूण 40 व्यक्ती राहू शकतात आणि सध्या या आश्रयस्थानामध्ये 23 महिलांना आश्रय देण्यात आला आहे.

  6. म्हापसा आश्रयस्थान
    म्हापसा आश्रयस्थान “आझिलो दे एन.एस. दोस मिलाग्रेस हॉस्पिटल” ला जोडलेले आहे जे म्हापसा शहराच्या मध्यभागी आहे. ही इमारत 1875 साली बांधण्यात आली होती. ही इमारत 1977 मध्ये आय.पी.ए (प्रोवेदोरिया) ला ताब्यात करण्यात आली होती. ही संस्था आसर्‍याची गरज असलेल्या दोन्ही लिंगातील वृद्ध निराधार लोकांची देखभाल करत आहे. केंद्राची क्षमता 40 आहे. सध्या येथे 28 महिला आहेत. कर्मचारी सेवा देऊन या निवाशांना मदत करत आहेत.
  7. चिंबल आश्रयस्थान
    लोक सहायता संस्था (प्रोवेदोरिया) गोव्यात अनेक ठिकाणी वृद्धाश्रमांची देखभाल करत आहे. अशा ठिकाणांपैकी एक म्हणजे चिंबल येथील वृद्धांसाठी वृद्धश्रम आहे. 1982 साली आश्रयस्थानासाठी इमारत बांधण्यात आली होती. प्रोवेदोरियाने हे वृद्धाश्रम ताब्यात घेण्यापूर्वी, आसरा नसलेल्या आणि ज्यांच्याकडे उत्पन्नाचा कोणताही स्रोत नाही त्यांची काळजी घेण्यास नातेवाईक नाहीत अशा वृद्ध निराधार लोकांच्या देखभालीसाठी प्रोवेदोरियाला आरोग्य खाते दिले होते.

    या आश्रयस्थानाची संख्या 80 आहे. याशिवाय सरकारने या केंद्राला भरती केंद्र आणि भिकार्‍यांसाठी प्रमाणित संस्था म्हणून घोषित केले आहे.

    सध्या या वृद्धाश्रमात 28 पुरुष आणि 32 महिला असे एकूण 60 निवासी राहत आहेत. त्यांच्यावर सतत लक्ष ठेवण्याची आणि काळजी घेण्याची आवश्यकता असते जे केंद्राचे कर्मचारी करतात.

    लोक सहायता संस्था (प्रोवेदोरिया) त्यांच्या आरोग्याची काळजी घेते आणि मृत्यू झाल्यास त्यांचे नातेवाईक नसल्यास प्रोवेदोरियाद्वारे अंतिम संस्कार केले जातात. या निवाशांची देखभाल करण्यासाठी आणि कल्याणकारी कामांसाठी प्रोवेदोरियाने आवश्यक कर्मचारी नियुक्त केले आहेत.

  8. कांदोळी आश्रयस्थान
    कांदोळीच्या आश्रयस्थानाची सध्याची इमारत आय.पी.ए. (प्रोव्हेडोरिया) ला 1951 मध्ये श्री. फर्नांदो दा कुन्य पिन्यू यांनी दान केली होती. या आश्रयस्थानात फक्त पुरुष निवासी राहतात. या आश्रयस्थानाची क्षमता 40 आहे. सध्या येथे 19 निवासी आहेत. कांदोळी हे गाव पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे आणि अनेक पर्यटक या आश्रयस्थानात येऊन आमच्या निवाशांना भेटतात. श्री. अँथनी लोपेस दृष्टिहीन निवासी आणि दुसरा पोलिओग्रस्त निवासी श्री. भाधुर हे दोघे कॅनिंगच्या कामात तज्ज्ञ आहेत. बहुतेक सरकारी काम या दोन व्यक्तींवर सोपविले जाते जे हे काम चोखपणे करत आहेत.
  9. रेशॉलिमेन्तो दे सेरा
    रेशॉलिमेन्तो दे सेरा आल्तिनो येथे स्थित आहे. या आश्रयाची स्थापना विधवा आणि निराधार मुलांना आश्रय देण्यासाठी पूर्वीच्या सांता काजा दे मिसेरीकॉर्दिया यांनी केली होती. मुक्तीनंतर या आश्रयाचे व्यवस्थापन आरोग्य सेवा संचालनालयाकडे सोपविण्यात आले. 1968 मध्ये सदर आश्रयाचा ताबा लोक सहायता संस्थेकडे (प्रोवेदोरिया) देण्यात आली. त्यावेळी या आश्रयगृहात मोजकेच निवासी राहत होते. प्रोवेदोरियाला निवाशांची काळजी घेण्यास सांगण्यात आले.

    सध्या प्रोवेदोरिया वृद्ध आणि निराधार महिलांसाठी हे आश्रयस्थान चालवत आहे. या आश्रयस्थानाची संख्या 25 आहे. सध्या 16 निवासी आश्रयस्थानात आहेत.

    संपूर्ण गोव्यासाठी रेशॉलिमेन्तो दे सेरा ला बेघरांसाठी रात्र निवारा म्हणून शासकीय राजपत्र शृंखला I क्र. 45 दिनांकीत 03/02/2011 मध्ये प्रकाशित अधिसूचना क्र.7-5(1)2011/PPA/2843 दिनांकीत 17 जानेवारी, 2011 द्वारे घोषित करण्यात आले आहे. तसेच कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, 2005 आणि नियम 2006 अंतर्गत कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांच्या संरक्षणासाठी निवारा म्हणून शासकीय राजपत्र शृखंला I क्र.28 दिनांकीत 11/10/2007 (आश्विन 19,1929) मध्ये प्रकाशित अधिसूचना क्र.2-104(12)-2006/DW&C/Part/I/1153 दिनांकीत 8 ऑक्टोबर, 2007 द्वारे घोषित करण्यात आले.

  10. विक्टर दा गामा निवृत्तीगृह
    साळगांव, गोवा येथील “ओबॅचेम येरीक” ज्याला “केबॅचेमी येरीक” म्हणूनही ओळखले जाते, हे साळगांव बार्देश गोवा येथील (1) (1) श्री. जुझे कायतान वालेंतीन दा गामा, (2) श्रीमती मारिया जेनेरोसा पामेला दा गामा यांनी आयपीए (प्रोवेदोरिया) द्वारे प्रदान केलेल्या सेवांच्या संदर्भात निराधार आणि वृद्ध लोकांची काळजी घेण्यासाठी 11/03/2013 रोजी आयपीए (प्रोवेदोरिया) ला दान केले आहे. 27/02/2014 रोजी उद्घाटन करण्यात आलेल्या “विक्टर दा गामा निवृत्तीगृह”चा उपयोग ज्येष्ठ नागरिकांच्या निवासासाठी व्हावा अशी त्यांची इच्छा आहे.

    उद्घाटन माननीय मुख्यमंत्री आणि प्रोवेदोरिया मंत्री श्री. मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते झाले यावेळी माननीय पर्यटन मंत्री श्री.दिलीप परुळेकर, साळगांव ग्रामपंचायत सरपंच श्री. एकनाथ ओरस्कर, प्रोवेदोरियाचे सचिव श्री. पवन के सैन, आणि प्रोवेदोरियाचे संचालक श्री. पी.के. पाटीदर उपस्थित होते.

    सरासरी आय.पी.ए (प्रोवेदोरिया) वर रु. 1,800/- प्रति व्यक्ती प्रति महिना प्रत्येक निवाशांच्या अन्नावर खर्च करत आहे. याशिवाय कपडे, अंथरूण इत्यादी मोफत दिले जातात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रोवेदोरियाने मानद डॉक्टरांची नियुक्ती केली आहे आणि सर्व औषधे प्रोवेदोरियाकडून मोफत पुरवली जातात.
    या निवाशांच्या करमणुकीसाठी त्यांना टीव्ही, रेडिओ/संगीता बरोबरच कॅरम, फुटबॉल, पत्ते इत्यादी खेळ, वृत्तपत्रे, कादंबर्‍या आणि धार्मिक पुस्तके इत्यादी पुरविल्या जातात जेणेकरून त्यांना आरामदायक वाटेल. आय.पी.ए (प्रोवेदोरिया) त्यांच्या आरोग्याची काळजी घेते आणि मृत्यू झाल्यास त्यांचे नातेवाईक नसल्यास त्यांचे अंतिम संस्कार प्रोवेदोरियाद्वारे केले जातात. या निवाशांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रोवेदोरियाने कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे.

मुलांसाठी आश्रयगृह

  1. गोवा वेल्हा केंद्र
    अनाथ आणि बिगर अनाथ निराधार मुलींना आश्रय, शिक्षण देण्यासाठी हे केंद्र गोवा वेल्हा येथे अनाथाश्रम म्हणून काम करते. अनेक वेळा अपरिहार्य परिस्थितीमुळे जसे पालकांना कुष्ठरोग, कर्करोग, टी.बी. सारखे गंभीर आजार असल्यामुळे किंवा कमावत्या सदस्याचा तुरुंगवास किंवा आर्थिक समस्येमुळे पालक आपल्या मुलांचे संगोपन करू शकत नाहीत अशा मुलींना केंद्रात प्रवेश देऊन त्यांना दहावीपर्यंत मोफत शिक्षण, अन्न, औषधोपचार, कपडे इ. दिले जाते. दहावीनंतरही मुलींना आधार मिळण्यासाठी त्यांच्या योग्यतेनुसार उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित केले जाते. मुलींना फुले बनविणे, भरतकाम वगैरे शिकवले जाते.

    सध्या येथे 15 मुली आहेत.

  2. कांदोळी केंद्र
    कांदोळी केंद्र हे मुलांसाठी अनाथाश्रम आहे. 1957 मध्ये कै.श्रीमती लुईजा दे सौझा यांनी या संस्थेला हा परिसर दान केला होता. हे सांगण्यात खूप अभिमान वाटतो की या घरात प्रसिद्ध संमोहन तज्ज्ञ श्री. आबे दे फारियाचा जन्म झाला होता. या केंद्राची क्षमता 40 आहे. सध्या या केंद्रात 20 मुले आहेत जी कांदोळी परीसरातील शाळेत शिकत आहेत.

    ही संस्था त्यांना शालेय पुस्तके, स्टेशनरी, कपडे, भोजन इत्यादी सर्व सुविधा पुरविते. हे विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर, त्यांना विद्यार्थ्यांच्या कलागुणांवर अवलंबून उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित केले जाते.

    1996 मध्ये या केंद्रातील श्री सय्यद शेख हा विद्यार्थ्यी चांगल्या गुणांसह दहावी उत्तीर्ण झाला. सध्या तो पणजी येथील शासकीय पॉलिटेक्निकमध्ये शिकत आहे. त्याच्या अभ्यासाचा तसेच राहण्याचा सर्व खर्च ही संस्था करत आहे.