या संस्थेच्या कार्यांची देखरेख या संस्थेच्या खालील विभागांद्वारे केली जाते आणि कर्मचारी विभागाची विभागनिहाय तैनाती पुढिलप्रमाणे आहेः-

  • प्रशासकीय विभाग — सहायक संचालक (प्रशासन)
  • कार्यक्रम/कल्याण विभाग – सहायक संचालक (कार्यक्रम/कल्याण)
  • लॉटरी विभाग – सहायक संचालक लॉटरी
  • लेखा विभाग – सहायक लेखाधिकारी
  • तांत्रिक विभाग – सहायक अभियंता

सहायक संचालकांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे एक शाखा कार्यालय मडगाव येथे आहे.

कार्य/काम वृद्धाश्रमात प्रवेश
कार्यात्मक प्रमुख संचालक
प्रक्रिया विहित नमुन्यातील अर्ज
कागदपत्राची यादी 1. वयाचा दाखला2. सरकारी हॉस्पिटल/आरोग्य केंद्राकडून वैद्यकीय दाखला

3. सक्षम प्राधिकार्‍याद्वारे जारी केलेला उत्पन्न दाखला/दारिद्र्य दाखला

4. 15 वर्षाचा रहिवासी दाखला

5. समाज कल्याण अधिकारी किंवा संपर्काधिकार्‍याद्वारे घरभेट अहवाल

वेळ मर्यादा 2 आठवडे

 

कार्य/काम अनाथाश्रम/आश्रयगृहांमध्ये प्रवेश
कार्यात्मक प्रमुख संचालक
प्रक्रिया विहित नमुन्यातील अर्ज
कागदपत्रांची यादी
  1. जन्म दाखला
  2. सरकारी हॉस्पिटल/आरोग्य केंद्राकडून वैद्यकीय दाखला
  3. सक्षम प्राधिकार्‍याद्वारे जारी केलेला उत्पन्न दाखला/दारिद्र्य दाखला
  4. 15 वर्षाचा रहिवासी दाखला
  5. यथास्थिती शाळा सोडल्याचा दाखला
  6. समाज कल्याण अधिकारी किंवा संपर्काधिकार्‍याद्वारे घरभेट अहवाल
वेळ मर्यादा 2 आठवडे

 

कार्य/काम तात्काळ मदत – आकस्मिक मृत्यू, आजारपण, शारिरीक किंवा मानसिक क्षमता, बेरोजगारी, निर्जन किंवा कमावत्या सदस्याच्या तुरुंगवासामुळे असहाय स्थितीत राहिलेल्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला.
कार्यात्मक प्रमुख संचालक
प्रक्रिया विहित नमुन्यातील अर्ज
कागदपत्रांची यादी
  1. सक्षम प्राधिकार्‍याद्वारे जारी केलेला उत्पन्न दाखला/दारिद्र्य दाखला
  2. 15 वर्षाचा रहिवासी दाखला
  3. कुटुंब असहाय स्थितीत आहे असे दर्शविणारा नगरपालिका किंवा पंचायतीकडील कोणताही पुरावा/दाखला.
वेळ मर्यादा 2 आठवडे

 

कार्य/काम तात्काळ मदत – मोफत औषधांचा पुरवठा
कार्यात्मक प्रमुख संचालक
प्रक्रिया विहित नमुन्यातील अर्ज
कागदपत्रांची यादी
  • सक्षम प्राधिकार्‍याद्वारे जारी केलेला उत्पन्न दाखला/दारिद्र्य दाखला
  • 15 वर्षाचा रहिवासी दाखला
  • जी.एम.सी./सरकारी आरोग्य केंद्र/हॉस्पिसीओ हॉस्पिटलकडून वैद्यकीय दाखला
वेळ मर्यादा 2 आठवडे

 

कार्य/काम तात्काळ मदत – मुलींच्या लग्नासाठी सहाय्य-रु.1000/-
कार्यात्मक प्रमुख संचालक
प्रक्रिया विहित नमुन्यातील अर्ज
कागदपत्रांची यादी
  1. सक्षम प्राधिकार्‍याद्वारे जारी केलेला उत्पन्न दाखला/दारिद्र्य दाखला
  2. 15 वर्षाचा रहिवासी दाखला
  3. नागरी निबंधकाकडून नागरी विवाह दाखला
  4. लग्नपत्रिका
वेळ मर्यादा 2 आठवडे

 

कार्य/काम तात्काळ मदत – मोफत चष्म्याचा पुरवठा
कार्यात्मक प्रमुख संचालक
प्रक्रिया विहित नमुन्यातील अर्ज
कागदपत्रांची यादी
  1. सक्षम प्राधिकार्‍याद्वारे जारी केलेला उत्पन्न दाखला/दारिद्र्य दाखला
  2. 15 वर्षाचा रहिवासी दाखला
  3. सरकारी वैद्यकीय नेत्ररोगतज्ज्ञाकडून वैद्यकीय दाखला आणि डॉक्टरांनी जारी केलेल्या चष्म्यासाठी प्रिस्क्रिप्शन
वेळ मर्यादा 25 दिवस

 

कार्य/काम तात्काळ मदत – मृत नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी सहाय्य- रु.1000/-
कार्यात्मक प्रमुख संचालक
प्रक्रिया विहित नमुन्यातील अर्ज
कागदपत्रांची यादी
  1. सक्षम प्राधिकार्‍याद्वारे जारी केलेला उत्पन्न दाखला/दारिद्र्य दाखला
  2. 15 वर्षाचा रहिवासी दाखला
  3. मृताचा मृत्यू दाखला. मृत व्यक्तीशी अर्जदाराचे नाते.
वेळ मर्यादा 1 आठवडे

 

कार्य/काम गरीब कुटुंबाला मोफत विद्युत जोडणी मिळण्यासाठी सहाय्य (एल.आय.जी)
कार्यात्मक प्रमुख संचालक
प्रक्रिया
  1. विहित नमुन्यातील अर्ज- गट विकास कार्यालयाच्या कार्यालयात उपलब्ध.
  2. विद्युत विभाग विद्युत जोडणीसाठी अंदाज खर्ज तयार करतो.
  3. विद्युत खाते पेमेंटसाठी प्रोवेदोरियाला अंदाज खर्च सादर करतो. प्रोवेदोरिया संबंधित विद्युत खात्याला डिमांड ड्राफ्टद्वारे कमाल रु. 1250/- देतो आणि नंतर विद्युत खाते विद्युत जोडणी जारी करतो.
कागदपत्रांची यादी एलआयजी योजनेंतर्गत सेवा जोडणी शुल्कासाठी विद्युत खात्याकडून कमी ताण सेवांसाठी फर्म कोटेशन.
वेळ मर्यादा 2 आठवडे ते 4 आठवडे

 

 

कार्य/काम दिव्यांगांना कृत्रिम साधने/उपकरणे खरेदीसाठी सहाय्य
कार्यात्मक प्रमुख संचालक
प्रक्रिया (1) विहित नमुन्यातील अर्ज
कागदपत्रांची यादी
  1. सक्षम प्राधिकार्‍याद्वारे जारी केलेला उत्पन्न दाखला/दारिद्र्य दाखला
  2. 15 वर्षाचा रहिवासी दाखला
  3. विहित नमुन्यात आवश्यक असलेल्या कृत्रिम साधने/उपकरणाचे स्वरुप आणि  दिव्यांगत्व प्रमाणित करणारा डॉक्टरांचा दाखला.
वेळ मर्यादा 2 आठवडे

 

कार्य/काम बक्षीस विजेत्या लॉटरी तिकिटाची बक्षीस रक्कम भरणे
कार्यात्मक प्रमुख संचालक
प्रक्रिया विहित नमुन्यातील अर्ज
कागदपत्रांची यादी
  1. दावा फॉर्म आयपीए एल.5
  2. पारितोषिक विजेती तिकिटे
  3. पहिले बक्षिस मिळविल्याचा दावा करताना विजेत्यांच्या तिकेटी सहित पासपोर्ट आकाराचा फोटो
  4. ओळख दाखला
वेळ मर्यादा 1ले बक्षिस विजेत्यांना सोडले तर उर्वरित सर्वांना तात्काळ स्वरुपात, आणि 1ल्या विजेत्याच्या तिकिटीसाठी 90 दिवसांचा कालावधी

 

कार्य/काम एजंट्सची नियुक्ती
कार्यात्मक प्रमुख संचालक
प्रक्रिया विहित नमुन्यातील अर्ज
कागदपत्रांची यादी
  1. आयपीए एल 1 मधील अर्ज
  2. वाटप केलेल्या कोटाच्या 2% सुरक्षा ठेव
  3. आर्थिक स्थिरतेचा पुरावा
  4. फॉर्म आयपीए एल 2 मध्ये करार
वेळ मर्यादा 2 आठवडे

दिनांक 14/04/1960 रोजी लेजिस्लेटिव्ह डिप्लोमा 1984 च्या अनुच्छेद 15 द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, गोवा सरकार संपूर्ण गोवा राज्याच्या बेघरांसाठी रात्र आसरा म्हणून लोक सहायता खात्याद्वारे “रेशॉलिमेन्तो दा सेरा” आल्तिनो, पणजी गोवा, ला अधिसूचित करते.

पलंगाच्या उपलब्धतेवर तसेच रात्र आसरा कर्माचार्‍यांकडून केलेल्या आवश्यक जोखीम मूल्यांकनावर आश्रयगृहाचा प्रवेश अवलंबून असतो. कर्मचारी आणि इतर सेवा वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी प्रवेश करताना बॅग तपासले जाते.