प्रकार अधिनियम
विषय लेजिलेटिव्ह डिप्लोमा (पोर्तुगीज बुलेटीन)
संदर्भ क्र. बुलेटीन ऑफिशियल दो इस्तादो दा इंडिया शृंखला 1 क्र.15 दिनांक 14/4/1960 ची अधिसूचना क्र. 1984 मध्ये प्रकाशित केले आहे.
तपशील अधिसूचना क्रमांक 1200 दिनांकीत 7/8/1947 द्वारे तयार करण्यात आलेल्या लोक सहायता खात्याच्या संस्थेला प्रशासकीय आणि आर्थिक स्वायत्तता असलेले न्यायिक व्यक्तिमत्व देण्यात आले. गोवा सरकारच्या नियंत्रणाखाली असलेली ही एक अनोखी संस्था आहे.

 

प्रकार अधिनियम
विषय लेजिस्लेटिव्ह डिप्लोमा क्र. 1984 दिनांकीत 14/4/1960 च्या अनुच्छेद 16 मध्ये दुरुस्ती.
संदर्भ क्र. शासकीय राजपत्र शृखंला 1 क्र.26 दिनांकीत 1/10/2001 मध्ये प्रकाशित झालेला 2001 चा 61 गोवा अधिनियम
तपशील आयपीए (प्रोवेदोरिया) परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ

 

प्रकार नियम
विषय लोक सहायता संस्था नियम, 1985
संदर्भ क्र. शासकीय राजपत्र शृखंला 1 क्र.33 दिनांकीत 14/11/1985
तपशील संस्था नियम, 1985 अंतर्गत अनाथ, बिगर-अनाथांना प्रवेश आणि डिस्चार्ज

 

प्रकार नियम
विषय आयपीए (प्रोवेदोरिया), नोकर भरती नियम, 1996
संदर्भ क्र. गोवा सरकारच्या शासकीय राजपत्र शृखंला I, क्र.44 दिनांकीत 30/1/1997 मध्ये प्रकाशित झालेला 7/16/91/PROV/FIN/(R&C)दिनांकीत 26/12/1996
तपशील संचालक,  संयुक्त संचालक लेखा,/ सहायक संचालक, (कार्यक्रम/ प्रशासन), /सहायक संचालक (लॉटरी), सहायक संचालक (कल्याण), सहायक अभियंता, ए.ए.ओ, कनिष्ठ अभियंता, समाज कल्याण अधिकारी, लेखापाल, कार्यालयीन अधीक्षक, लॉटरी अधीक्षक, लॉटरी पर्यवेक्षक, संपर्क अधिकारी, वरिष्ठ लघुलेखक, केस वर्कर/कारभारीण/कारभारी/मुख्य कारकून/कनिष्ठ लघुलेखक/यूडीसी/लेखा कारकून /रोखपाल /एलडीसी या पदासाठी लोक सहायता संस्था (प्रोवेदोरिया) नोकर भरती नियम 1996.

 

प्रकार नियम
विषय तात्काळ मदत नियम, 1997 साठी गोवा योजना
संदर्भ क्र. गोवा सरकारच्या शासकीय राजपत्र, शृखंला.1 क्र. 24 दिनांकीत 11/9/1997 मध्ये प्रकाशित 6-1-97-IPA/1597 दिनांकीत 11/8/1997
तपशील तात्काळ मदत नियम 1997, योजनेसाठी गोवा योजनेचे नियम, पात्रता आणि योजनांची नावे, मंजूर रक्कम इत्यादी.

 

प्रकार नियम
विषय तात्काळ मदत नियम, (पहिली दुरुस्ती) 2000 साठी गोवा योजना
संदर्भ क्र शासकीय राजपत्र शृखंला 1 क्र.49 दिनांकीत 2/3/2000 मध्ये प्रकाशित 6-1-97-IPA/3628 दिनांकीत 10/2/2000
तपशील (a) गोवा तात्काळ मदत योजनेच्या नियम-5 मध्ये दुरुस्ती करून कुटुंबातील उत्पन्न रु.6000/- वरून रु.11,000/- पर्यंत वाढविण्यासाठी नियम-6 मध्ये दुरुस्ती.

(i) असहाय स्थितीतील व्यक्तीसाठी मदतीचे प्रमाण रु. 1,000/- वरून रु. 2,000/- पर्यंत वाढविणे.
(ii) औषधांची गरज असलेल्या व्यक्तींना मदतीची रक्कम रु. 3000/- वरून रु. 5000/- पर्यंत वाढविणे.
(iii) क्षयरोग, कर्करोग, आयएचडी (हृदयविकार) ग्रस्त व्यक्तींना मदतीची रक्कम रु. 5000/- वरून रु.15000 पर्यंत वाढविणे.

 

प्रकार नियम
विषय तात्काळ मदत नियम, (दुसरी दुरुस्ती) 2004 साठी गोवा योजना
संदर्भ क्र. शासकीय राजपत्र शृखंला 1 क्र.49 दिनांकीत 4/3/2004 मध्ये प्रकाशित 6-1-/2004/IPA/2865 दिनांकीत 16/2/2004
तपशील a) नियम 5 मध्ये दुरुस्ती. प्रदीर्घ उपचाराची गरज असलेल्या व्यक्तींना औषधोपचार बंद केल्याने त्यांचे जीवन धोक्यात येऊ शकते अशा व्यक्तिंचे वैद्यकीय सहाय्य रु. 15,000/- वरून रु. 30,000/- पर्यंत वाढविणे आणि जास्तीत जास्त उत्पन्नाची पात्रता रु. 11,000/- वरून 21,000/- पर्यंत वाढविणे.

b) नियम 6 मध्ये दुरुस्ती –
(i) वैद्यकीय उपचारांसाठी मदतीची रक्कम रु. 5000/- वरून रु.10,000 पर्यंत वाढविणे.
(ii) अंत्यसंस्कार/ दफनासाठी मदतीची रक्कम रु.500/- वरून रु. 1000/- पर्यंत वाढविणे.

 

प्रकार नियम
विषय आयपीए (प्रोवेदोरिया) नोकर भरती नियम, 2004
संदर्भ क्र. गोवा सरकारच्या शासकीय राजपत्र, शृखंला.1 क्र. 49 दिनांकीत 3/3/2005 मध्ये प्रकाशित 1-1-2004/IPA/2639 दिनांकीत 17/2/2005
तपशील गट ‘B’ आणि ‘C’ पदे जसे सहायक संचालक, सहायक लेखाधिकारी, समाज कल्याण अधिकारी, कार्यालय अधीक्षक आणि लेखापाल यांचे नियमन करण्यासाठी नोकर भरती नियम.

 

प्रकार नियम
विषय आयपीए (प्रोवेदोरिया) नोकर भरती नियम, 2005
संदर्भ क्र. गोवा सरकारच्या शासकीय राजपत्र, शृखंला.1 क्र. 27 दिनांकीत 6/10/2005 मध्ये प्रकाशित 1/1/2005-IPA/1519 दिनांकीत 14/9/2005
तपशील गट ‘C’ पदे जसे ए.एन.एम. आणि कार्पेन्टर याचे नियमन करण्यासाठी नोकर भरती नियम

 

प्रकार नियम
विषय तात्काळ मदत नियम, (तिसरी दुरुस्ती) 2011 साठी गोवा योजना
संदर्भ क्र. शासकीय राजपत्र, शृखंला.1 क्र. 13 दिनांकीत 30/06/2011 मध्ये प्रकाशित 2-15-2011-12/ Prov./899  दिनांकीत 16/06/2011
तपशील (a) नियम 5 ची दुरुस्ती – गोवा योजनेच्या तात्काळ मदत नियम, 1997 साठी नियम 5 मध्ये (यापुढे “मुख्य नियम” म्हणून ओळखले जाईल), उप-नियम (2) मधील, अक्षरे आणि आकडेवारींसाठी खंड (a) मध्ये “रु. 21,000/- वरून अक्षरे आणि आकडे “रु. 1,50,000” बदलले जातील.

(b) नियम 8 ची दुरुस्ती – मुख्य नियमांच्या नियम 8 मध्ये, उप-नियम (1) मध्ये जिथे अक्षरे आणि आकडेवारींसाठी “रु. 5,000/-“ आहे तिथे  अक्षरे आणि आकडेवारींसाठी “रु. 10,000/-.” बदलले जाईल.

(c) नियम 11 ची दुरुस्ती- मुख्य नियमांच्या नियम 11 मध्ये पुढील तरतूद समाविष्ट केली जाईल, म्हणजे:- उप-नियम (1) मध्ये “परंतु आर्थिक सहाय्याच्या विवेकाधीन मंजुरीसाठी अर्ज मुख्यमंत्री किंवा लोक सहायता संस्था (प्रोवेदोरिया) च्या मंत्री प्रभार्‍याकडे  सादर केला जाईल.

 

प्रकार नियम
विषय तात्काळ मदत नियम, (चौथी दुरुस्ती) 2013 साठी गोवा योजना
संदर्भ क्र. शासकीय राजपत्र, शृखंला.1 क्र. 3 दिनांकीत 18/04/2013 मध्ये प्रकाशित 2-15-2011-12/ Prov./Part  दिनांकीत 08/04/2013
तपशील (2) नियम 9 ची दुरुस्ती – गोवा योजनेच्या तात्काळ मदत नियम, 1997 साठी नियम 9 मध्ये (यापुढे “मुख्य नियम” म्हणून ओळखले जाईल)
(i) अक्षरे आणि आकडेवारींसाठी  “रु. 5,000/-”, वरून अक्षरे आणि आकडेवारींसाठी “रु. 25,000/-” बदलले जातील.

(ii) अक्षरे आणि आकडेवारींसाठी “रु. 3,000/-“ वरून अक्षरे आणि आकडेवारींसाठी “रु. 5,000/- बदलले जातील.

(iii) खालील तरतूद समाविष्ट केली जाईल, ती म्हणजे:-

“परंतु, वित्त विभागाच्या संमतीच्या अधीन विशेष परिस्थितीत मुख्यमंत्र्यांकडून रु. 25,000/- पेक्षा जास्त आर्थिक सहाय्य पण रु. 1.00 लाख पर्यंत मंजूर केले जाऊ शकतात.

  1. नियम 11 ची दुरुस्ती – मुख्य नियमांच्या नियम 11 च्या उप-नियम (1) च्या तरतुदीमध्ये, “अर्ज प्रदान केल्यावर” अभिव्यक्ती “अर्जदाराने रीतसर स्वाक्षरी केलेल्या साध्या कोर्‍या कागदावर” अर्ज समाविष्ट केले जातात.